लांजा-आसगे मार्गावरील चिरे वाहतुकीचे ट्रक अडविले

Team RatnagiriLive
1 Min Read

लांजा :  लांजा-आसगे-तळवडे-दाभोळे या रस्त्यावरील चिरेवाहतुक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाच्या घेतलेल्या भूमिकेनंतरही या मार्गावर चिरे वाहतूक सुरू असल्याने काही ग्रामस्थांनी कुरुचुंब येथे चिरे वाहतूक करणारे ट्रक अडविले.

लांजा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाच्या भूमिकेनंतर प्रशासनाने चिरे वाहतूक बंद करण्याच्या सूचना खाणमालक यांना दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी दाजी गडहिरे यांच्या शिषटमंडळा सांगण्यात आले होते  तसे या पदाधिकारी यांनी मीडियाला चिरे वाहतूक बंद झाल्याचे सागितलं होते. मात्र, आज सकाळपासून चिरे वाहतूक सुरू असल्याचे समजल्यावर काही ग्रामस्थांनी वाहतूक करणाऱ्या चिऱ्याच्या ट्रकचा पाठलाग केला. या रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यावरून वाहनधारकांना गाडी चालवणे कठीण बनले आहे. मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून  अवजजड वाहतुकीची दुचाकी वाहने चलिविणे तारेवरची कसरतच करावी लागते.

लांजा तहसिलदार यांचे या बाबत लक्ष वेधण्यात आले होते. तळवडे, कूरूचुंब, आसगें, आडवली आदी गावातील ग्रामस्थांनी  या रस्त्याच्या परिस्थितीकडे तालुका प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment