गणपतीपुळे येथील समुद्रात दोन पर्यटकांचा मृत्यू

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे मंदिरानजीकच्या समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. बुडालेल्यामध्ये जयगड येथील एका नामांकित कंपनीतील दोघा जणांचा समावेश आहे.

येथील समुद्रात स्नानासाठी उतरलेल्या पर्यटकांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या दुर्घटनेत मोहम्मद आसिफ (वय ३५ राहणार पश्चिम बंगाल, सध्या रा. जयगड व प्रदीपकुमार, वय ३५, राहणार ओडिशा, सध्या जयगड) या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर ठुकु डाकवा (३०, उत्तराखंड, सध्या रा. जयगड) याला वाचविण्यात गणपतीपुळे येथील देवस्थानचे जीवरक्षक तसेच स्थानिकांना यश आले.

गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक स्थानिकांकडून केल्या जाणाऱ्या सुरक्षा सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अशा दुःखद घटनांची पुनरावृत्ती घडत आहे. रविवारच्या दुर्घटने दरम्यानही किनाऱ्यावरील जीवरक्षकांच्या सूचनांकडे दुर्घटनाग्रस्तांकडून दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment