महाराष्ट्रराष्ट्रीयशिक्षण

कौशल्य विद्यापीठाला रतन टाटा यांचे नाव

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : कौशल्य विकास विद्यापीठाला दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज झाली. यामध्ये कौशल्य विकास विद्यापीठाला उद्योगपती रतन टाटा यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयासह आगरी समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

  • 1. मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ पासून अंमलबजावणी. (सार्वजनिक बांधकाम)
  • 2. आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)
  • 3. समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण)
  • 4. दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)
  • 5. आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)
  • 6. वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)
  • 7. राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)
  • 8. पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)
  • 9. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)
  • 10. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार
  • 11. पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)
  • 12. किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)
  • 13. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)
  • 14. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे (वैद्यकीय शिक्षण)
  • 15. खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)
  • 16. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)
  • 17. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट
  • 18. उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)
  • 19. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास).

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button