रत्नागिरी ३ जानेवारीपासून चाचा नेहरू बाल महोत्सव

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : जिल्ह्यातील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय/स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ निराधार उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देवून त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी चाचा नेहरू बाल महोत्सव आयोजित करण्यात येतो. यावर्षी हा बाल महोत्सव दि. 3 जानेवारी ते 5 जानेवारी 2025 या कालावधीत छत्रपती शिवाजी स्टेडीयम मारुती मंदिर येथे आयोजित करण्यात आला असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

या महोत्सवात संस्थाबाहय (नगर परिषद शाळांमधील) मुलेही सहभागी होणार आहेत. बाल महोत्सवात क्रिकेट, खोखो, कबडडी, गोळाफेक, लांब उडी, 100 मीटर धावणे, 4 x 100 मीटर रिले, कॅरम, बुध्दीबळ, निबंध, चित्रकला, हस्ताक्षर, वक्तृत्व, अशा क्रीडा स्पर्धा तसेच सामुहिक नृत्य, सामुहिक गायन, नाटीका, वैयक्तिक नृत्य, वैयक्तिक गायन आदी सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment