सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत माने यांचे निधन

Team RatnagiriLive
1 Min Read
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील नवी मुंबई पोलिस आयुक्तालय यांतर्गत असलेल्या न्हावा शेवा पोलिस ठाण्यात गोपनीय शाखेत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत रावण माने (५४) यांचे नुकतीच नवी मुंबई येथील अपोलो रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक दुःखद निधन झाले आहे.

कुटुंबातील कर्ता असलेल्या चंद्रकांत माने यांची पत्नी मुलगा,विवाहित मुलगी,जावई असा त्यांचा परिवार आहे. यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांवर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.

नोकरीनिमित्त उरण शहरात रहिवासी झालेले चंद्रकांत माने यांच्या निधनाची बातमी कानी पडताच उरण तालुक्यातील अनेकांनी शोक व्यक्त केला. त्यांनी नवीमुंबई पोलिस दलात उरण, तुर्भे, नेरुळ, नवीमुंबई विशेष शाखा व शेवटी न्हावाशेवा पोलिस ठाण्यात गोपनीय शाखेत कार्यरत होते. त्यांनी पोलिस दलातील कार्यकाळात विविध क्षेत्रातील व्यक्तींसह सामान्य नागरिकांशी गोड स्वभावामुळे माणुसकीचे ऋणानुबंध निर्माण केले होते.
Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment