बिझनेस जत्रा २०२५ मध्ये उद्योजकांचा सन्मान

Team RatnagiriLive
1 Min Read

ठाणे : महाराष्ट्रातील उद्योजकतेचा सन्मान करण्यासाठी आणि MSMEs (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) सशक्त करण्यासाठी आयोजित बिझनेस जत्रा २०२५ चे उद्घाटन राज्याच्या उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजकांचा ना. उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी राज्याच्या औद्योगिक प्रगती संदर्भात बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, राज्यातील विरोधकांकडून उद्योग विभागावर टीका केली जात असली, तरी आरबीआयने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या सर्वेक्षणानुसार, 1,13,236 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून, महाराष्ट्र पुन्हा एकदा देशात क्रमांक एक वर असल्याचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने ना. सामंत यांनी सांगितले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment