भोके-रेवाळेवाडी रस्त्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Team RatnagiriLive
0 Min Read

रत्नागिरी : तालुक्यातील भोके – रेवाळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या विकासकामांचे उद्‍घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले.

या प्रसंगी कोनशीलेचे अनावरण करून रस्त्याचे जनतेसाठी औपचारिक लोकार्पण करण्यात आले.
हा रस्ता स्थानिक रहिवाशांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, या विकासकामामुळे परिसराचा सर्वांगीण विकास अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांसह गावातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment