विठ्ठलवाडी-कल्याण ते रत्नागिरी एसटीची ‘रातराणी’ बस सुरू;

Team RatnagiriLive
1 Min Read
  • रात्री ९ वाजता विठ्ठलवाडी येथून सुटणार

विठ्ठलवाडी/कल्याण : ठाणे विभागातील विठ्ठलवाडी आगाराने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. विठ्ठलवाडी-कल्याण ते रत्नागिरी या मार्गावर आता दिवसाच्या बस सेवेसोबतच रात्रीची ‘रातराणी’ एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. डोंबिवली, पनवेल, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर मार्गे या बसचा प्रवास रत्नागिरीला संपेल.

​ही एसटी बस रोज रात्री ०९:०० वाजता विठ्ठलवाडी आगारातून रत्नागिरीसाठी रवाना होईल. नोकरदार आणि रात्रीचा प्रवास प्राधान्य देणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत सोयीची ठरणार आहे. रत्नागिरी आणि कोकणातील विविध भागांत जाणाऱ्या प्रवाशांनी या नवीन ‘रातराणी’ बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाच्या विठ्ठलवाडी आगाराकडून करण्यात आले आहे.

  • मार्ग: विठ्ठलवाडी (कल्याण) ते रत्नागिरी
  • वेळ: रात्री ०९:०० वाजता (दररोज)
  • आगार: विठ्ठलवाडी आगार (ठाणे विभाग)
Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment