उरण रेल्वे स्थानकावरील लिफ्टचे काम अपूर्ण

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : उरण येथे नुकत्याच सुरू झालेल्या उरण-नेरुळ हार्बर रेल्वेला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. उरण येथील हार्बर रेल्वे स्टेशनकरिता दोन लिफ्टचे काम अपूर्ण राहिले आहे.

या रेल्वे स्थानकावरील तिकीट बुकींगचे कार्यालयाच्या पूर्वेकडील टॉयलेट सुरु असून पश्चिमेकडील टॉयलेट बंद आहे. उरण स्टेशनवर लहान मुलांकरीता फिडिंग रुम अस्तित्वात नाही. तसेच स्टेशनची सफाई ४ ते ५ सफाई कामगारांमार्फत दुपारी व संध्याकाळी केले जाते. त्यामुळे प्रवाशांना धुळीचा सामना करावा लागत आहे.

भटक्या कुत्र्यांचा वावर

स्टेशनमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर असून सुरक्षा रक्षक यावर लक्ष देत नाहीत. रेल्वे स्टेशनवर कँटिंगची सुवीधा नसून रिक्षा व्यवस्था ही अपूरी असून गर्दीचे वेळी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा पहावयास मिळतात. खरे पहाता, रेल्वेच्या नियमाप्रमाणे रेल्वे प्रत्येक स्थानकामध्ये ५ ते ६ सेकंद थांबण्याचा नियम असताना उरण रेल्वे स्थानका दरम्यान ३ ते ४ मिनिटे घेते. त्यामुळे प्रत्येक रेल्वे १० ते १५ मिनिटे उशीराने धावते.
वरील प्रकाराने उरण येथील रेल्वे प्रवासी त्रस्त अजून सदरच्या मागणीसाठी प्रवाशी नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे बोलले जाते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment