ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र कांबळे विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण (विठ्ठल ममताबादे ) : भिलकटी येथील सध्या भांडुप येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांना मुंबई प्रभादेवी कामगार कल्याण मंडळ मुंबई या ठिकाणी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, राज्यमंत्री ऍड. आकाश फुंडकर आधी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले.

यावेळी राज्यमंत्री वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार ऍड. आशिष जयस्वाल, प्रधान सचिव कामगार उद्योग ऊर्जा कामगार व खणी कर्म विभाग आय. ए. कुंदन (भा. प्र. से) आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह, प्रमाणपत्र पुस्तक,शाल, फेटा, रोख रक्कम पंचवीस हजार देऊन मोठ्या थाटामाटात विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन श्री. कांबळे यांचा सन्मान करण्यात आला.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment