न. प. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कॉ. पवार, पगारे यांचे उद्यापासून आझाद मैदानावर उपोषण

Team RatnagiriLive
2 Min Read

उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायत कामगार कर्मचारी यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांबाबत कॉ. संतोष पवार तसेच कॉ. रामदास पगारे हे दिनांक 26 मे पासून मुंबईत आझाद मैदानावर उपोषणास बसणार आहेत

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री ना.एकनाथ जी शिंदे यांनी तत्कालीन राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त सचिव मनोज गुप्ता, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव श्री सुमंत भांगे, नगरविकास विभाग प्रधान सचिव सोनिया सेठी, आयुक्त तथा संचालक ड.  किरण कुलकर्णी असे उच्च पदस्थ आधिकाऱ्यांच्या उपस्थित दि. २०/३/२०२३ रोजी विधान भवन येथे सकारात्मक निर्णय घेण्यात आले. परंतू गेले २ वर्षे होऊनही या सकारात्मक निर्णयाची अमलबजावणी झालेली नाही. विविध कामगार संघटनांनी सातत्याने या बाबत सतत पाठपुरावा आमलबजावणी करिता धरणे, मोर्चे, लॉग मार्च असे विविध प्रकारे आंदोलने करण्यात आली.  त्या – त्या वेळी इतिवृत्त तयार करण्यात आले परंतू अपेक्षित आमलबजावणी झालीच नाही.
या पार्श्वभूमीवर या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडवून घेण्यासाठी तसेच नगरविकास विभाग आणि वित्त विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मनातील नकारात्मक भूमिकेमुळे कामगार कर्मचारी, निवृत्त कर्मचाऱी वर्गाचे मोठ्या प्रमाणात होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद आणि नगर पंचायतीमधील हजारो कामगारांची अस्मिता जपण्यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगर पंचायत कामगार कर्मचारी संघर्ष समितीचे मुख्य संघटक कामगार नेते ॲड. कॉ.संतोष पवार उरण नगर परिषद व उत्तर महाराष्ट्र नगर परिषद कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.रामदास पगारे मनमाड नगर परिषद यांच्यावरील व ईतर कामगार प्रतिनिधीवर रोषापोटी, आकस व सूडबुद्धीने हेतुपुरस्सर केलेली कारवाई त्वरित मागे घेण्यात यावी म्हणून सोमवाररी २६  मे २०२५ पासून महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीचे नेते काॅ. डॉ डि एल कराड, ॲड सुरेश ठाकूर, रामगोपाल मिश्रा, रामेश्वर वाघमारे, ॲड सुनील वाळूंजकर, अनिल जाधव, अनिल पवार, आण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे कॉ.संतोष पवार उरण व कॉ.रामदास पगारे मनमाड हे आमरण उपोषणास बसणार आहेत.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment