‘स्पर्श’ प्रणालीमध्ये माजी सैनिकांनी, कुटुंब पेन्शनधारकांनी माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : SPARSH प्रणालीमध्ये अनेक माजी सैनिकांची व कुटुंब पेन्शनधारकांची काही महत्त्वाची माहिती अद्ययावत झालेली नाही. त्यामुळे भविष्यात कोणतीही अडचण उद्भवू नये व पेन्शन थांबण्याची शक्यता टाळता यावी, यासाठी आपले आधार क्रमांक, पॅन क्रमांक, ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक, डिजिटल लाईफ सर्टिफिकेट (Digital Life Certificate) तातडीने अद्ययावत करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व कुटुंब पेन्शनधारक यांनी आपला आधार क्रमांक, पॅन क्रमांक, मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी आपल्या PPO मध्ये तपासुन पहा व ज्यांचा नसेल त्यांनी लवकरात लवकर ई-मेल किंवा नोंदणीकृत टपालाद्वारे आपल्या संबंधित अभिलेख कार्यालयात (Record Office) ला पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment