रत्नागिरी : रत्नागिरीतून गणपतीपुळ्याला जाणाऱ्या रस्त्यावर काळबादेवी इथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन गुरुवारी (१२ जून २०२५) सकाळी अपघात झाला. यामध्ये दोन्ही बसचे चालक किरकोळ जखमी झाले असून, सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
पावसामुळे माती-चिखल रस्त्यावर येऊन निसरड्या झालेल्या रस्त्यामुळे चालकांना वळणावर अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघात झालेल्या दोन बसेसपैकी एक बस शहर वाहतूक विभागाची होती आणि ती रत्नागिरीच्या दिशेने येत होती. दुसरी बस गणपतीपुळ्याच्या दिशेने जात होती.
