देवर्षी नारद पत्रकार सन्मान सोहळा २८ जून रोजी रत्नागिरीत

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : ‘विश्व संवाद केंद्र, मुंबई’ यांचा वार्षिक ‘‘देवर्षी नारद पत्रकार सन्मान सोहळा’’ शनिवार दि. २८ जून २०२५ रोजी सायंकाळी ५:०० ते ६:३० या वेळेत शिर्के हायस्कूलच्या रंजन मंदिरात आयोजित केला आहे.

राष्ट्रीय विचारसरणीचे व देशहिताचे भान ठेवून कार्य करणाऱ्या मूल्यनिष्ठ पत्रकारांना सन्मानाने गौरवण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे एअर मार्शल (नि.) हेमंत भागवत आणि प्रमुख वक्ते श्री. अभिजित हरकरे उपस्थित राहणार आहेत. तरी आपणही या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment