रत्नागिरीचे सुपुत्र डॉ. झिशान मस्कर युरोलॉजी सुपर स्पेशालिटी परीक्षेत विद्यापीठात दुसरे

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : रत्नागिरीतील डॉ. मुनीर म्हस्कर यांचे सुपुत्र, डाॅ. झिशान म्हस्कर नुकतेच मूत्रमार्गाच्या शल्यचिकित्सेतील सर्वोच्य परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत (Mch युरोलॉजी सुपर स्पेशॅलिटी) या परीक्षेत ते विद्यापीठात दुसरे आले आहेत.

या आधी डाॅक्टर झीशान म्हस्कर यांनी २०२१ मध्ये MS जनरल सर्जरीची पदवी संपादन केली आहे.
शालेय जीवनापासून बुद्धिमान असलेले झीशान यांनी २००८ मध्ये दहावी एसएससी परीक्षेत संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला होता.

डाॅ. झिशान रत्नागिरीत लवकरच खाजगी प्रॅक्टिस सुरू करणार आहेत.

युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट (पुरुष वंध्यत्व आणि लैंगिक आरोग्य) आणि एव्ही फिस्टुला यावरील शस्त्रक्रिया ही त्यांची स्पेशालिटी असेल.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment