Mumbai-Goa highway | कशेडी घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळीत

Team RatnagiriLive
1 Min Read

खेड : गेले दोन तीन दिवस मुसळधार पाऊस सुरू असून मुंबई-गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात खेड तालुक्याच्या हद्दीत भुयारी मार्गाच्या सुमारे आधी 200 मीटर अंतरावर दरड कोसळली. ही घटना रविवारी (दि.१५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

गेल्या महिन्यात सुद्धा या ठिकाणी दरड कोसळून वाहतुकीला खोळंबा झाला होता. रविवारी सायंकाळी पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक एकाच लेनवरून सुरू ठेवण्यात आली. जवळपास दीड तासानंतर दरड हटविण्यासाठी यंत्रणा पाठवून दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment