‘प्रहार’च्या रणरागिणी काजल नाईक यांना ‘कोकणरत्न’ पुरस्कार प्रदान

Team RatnagiriLive
1 Min Read
प्रहार
रत्नागिरी  : रत्नागिरीतील नांदिवडे गावच्या सुकन्या व सध्या ठाणे जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ‘प्रहार’च्या रणरागिणी  सुनिता शशिकांत सुर्वे तथा सौ काजल परेश नाईक यांना कोकणरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. महाराष्ट्र तसेच मुंबई, ठाणे व  संपूर्ण कोकणामध्ये त्यानी आपला सामाजिक कार्यातून ठसा उमटवला आहे. दिव्यांगांना मासिक मानधन व दुकान देऊन त्यांनी दिव्यांगांचे संसार उभे केले आहेत. गोरगरिबांना, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सन्माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. प्रकल्पग्रस्तांना देखील त्यांनी त्यांच्या मागण्या व त्यांना न्याय मिळवून देण्यास मोलाचा वाटा उचलला आहे.

काजल नाईक रत्नागिरीतील नांदिवडे गावच्या सुकन्या

सध्या त्या प्रहार दिव्यांग क्रांती ठाणे जिल्हाध्यक्ष व कोकण विभाग महिला अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या अशा या सामाजिक कार्याची दखल घेत स्वतंत्र कोकण राज्य अभियानने त्यांना *कोकणरत्न* पुरस्कार जाहीर केला आहे. १३ डिसेंबर  २०२५ रोजी त्यांना मुंबई येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 रत्नागिरी मुंबई परिसरातून काजल ताई यांच्यावर अभिनंदनपर वर्षांवं होत आहे.
Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment