महाराष्ट्रराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज
Konkan Railway | आज मध्यरात्रीनंतर सुटणार कोकणसाठी होळी विशेष गाडी!
रत्नागिरी/सिंधुदुर्ग: होळीच्या सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मुंबई (CSMT) – सावंतवाडी दरम्यान विशेष ‘होळी स्पेशल’ रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
१. मुंबई CSMT – सावंतवाडी रोड – मुंबई CSMT स्पेशल (साप्ताहिक)
मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी अत्यंत महत्त्वाची ठरेल.
- गाडी क्र. ०१०७१: ही गाडी रविवार, १ मार्च २०२६ रोजी मुंबई CSMT येथून मध्यरात्री ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२:३० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
- गाडी क्र. ०१०७२: ही गाडी रविवार, १ मार्च २०२६ रोजी सावंतवाडी रोड येथून संध्याकाळी १७:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता मुंबई CSMT ला पोहोचेल.
- थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
- डब्यांची रचना: एकूण २० एलएचबी (LHB) डबे, ज्यामध्ये १८ ‘३-टायर एसी इकॉनॉमी’ डबे असतील.
- बुकिंग: या गाडीचे (०१०७२) आरक्षण २८ फेब्रुवारी २०२६ पासून आयआरसीटीसी (IRCTC) संकेतस्थळावर सुरू झाले आहे.





