Konkan Railway | आज मध्यरात्रीनंतर सुटणार कोकणसाठी होळी विशेष गाडी!

Team RatnagiriLive
1 Min Read
Konkan Railway

रत्नागिरी/सिंधुदुर्ग: होळीच्या सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मुंबई (CSMT) – सावंतवाडी  दरम्यान विशेष ‘होळी स्पेशल’ रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

१. मुंबई CSMT – सावंतवाडी रोड – मुंबई CSMT स्पेशल (साप्ताहिक)

​मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी अत्यंत महत्त्वाची ठरेल.

  • गाडी क्र. ०१०७१: ही गाडी रविवार, १ मार्च २०२६ रोजी मुंबई CSMT येथून मध्यरात्री ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२:३० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
  • गाडी क्र. ०१०७२: ही गाडी रविवार, १ मार्च २०२६ रोजी सावंतवाडी रोड येथून संध्याकाळी १७:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता मुंबई CSMT ला पोहोचेल.
  • थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
  • डब्यांची रचना: एकूण २० एलएचबी (LHB) डबे, ज्यामध्ये १८ ‘३-टायर एसी इकॉनॉमी’ डबे असतील.
  • बुकिंग: या गाडीचे (०१०७२) आरक्षण २८ फेब्रुवारी २०२६ पासून आयआरसीटीसी (IRCTC) संकेतस्थळावर सुरू झाले आहे.
Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment