ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-मडगाव दरम्यान धावणार ‘विशेष ट्रेन’

  • खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे आदी थांबे

मुंबई: दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद केल्यामुळे कोकणवासीयांमध्ये संताप असतानाच, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीचा निपटारा करण्यासाठी मुंबई CSMT ते मडगाव दरम्यान विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

मुंबई-मडगाव स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक (ट्रेन नं. ०११२९/०११३०)

​कोकण रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, प्रवाशांच्या सुविधेसाठी खालीलप्रमाणे विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे:

  • ट्रेन क्र. ०११२९ (मुंबई ते मडगाव): ही गाडी शुक्रवार दि. ३ एप्रिल आणि रविवार दि. ५ एप्रिल २०२६ रोजी मुंबई CSMT वरून मध्यरात्री ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल.
  • ट्रेन क्र. ०११३० (मडगाव ते मुंबई): ही गाडी शुक्रवार दि. ३ एप्रिल आणि रविवार दि. ५ एप्रिल २०२६ रोजी मडगाववरून दुपारी १६:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता मुंबई CSMT ला पोहोचेल.

कोकणातील ‘या’ महत्त्वाच्या स्थानकांवर असेल थांबा

ही विशेष ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी या स्थानकांवर थांबेल. यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बुकिंग कधी सुरू होणार?

​ट्रेन क्र. ०११३० (मडगाव – मुंबई स्पेशल) चे बुकिंग उद्या २४ मार्च २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रांवर (PRS) आणि IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार आहे. या ट्रेनला एकूण २२ डबे असून त्यात २ टायर एसी, ३ टायर एसी, स्लीपर आणि जनरल डब्यांचा समावेश असेल.

एकीकडे नवी ट्रेन, तर दुसरीकडे मनसेचे आंदोलन कायम!

​रेल्वेने ही विशेष ट्रेन जाहीर केली असली तरी, गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करून त्या जागी उत्तर भारतीय राज्यांसाठी कायमस्वरूपी गाड्या सुरू केल्याचा आरोप मनसेने केला आहे. याच अन्यायाविरोधात उद्या २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मनसे नेते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत.

​कोकणच्या हक्काची गाडी पुन्हा सुरू व्हावी, या मागणीसाठी महाराष्ट्र सैनिक आणि कोकणवासी उद्या मोठ्या संख्येने जमण्याची शक्यता आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button