मडगाव-मुंबई तेजस आणि मंगळुरू एक्स्प्रेसच्या प्रवासात बदल

Team RatnagiriLive
2 Min Read
  • दादर, ठाणे स्थानकातच संपणार प्रवास!

मुंबई : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने मध्य रेल्वेने मडगाव-मुंबई तेजस एक्स्प्रेस आणि मंगळुरू-मुंबई एक्स्प्रेस दादर व ठाणे स्टेशनवर शॉर्ट टर्मिनेट करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सुरू असलेल्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या (Platform Extension Work) कामामुळे मध्य रेल्वेने गाड्यांच्या वेळापत्रकात आणि थांब्यांमध्ये तात्पुरता बदल केला आहे. या अंतर्गत कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत ‘शॉर्ट टर्मिनेट’ (Short Termination) म्हणजेच अंतिम स्थानकाआधीच थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

​मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हा बदल करण्यात आला आहे.

कोणत्या गाड्यांवर होणार परिणाम? जाणून घ्या सविस्तर:

१) मडगाव ते मुंबई CSMT तेजस एक्स्प्रेस (Train No. 22120):

मडगाव जंक्शनवरून सुटणारी गाडी संख्या २२१२० ‘मडगाव जंक्शन – मुंबई CSMT तेजस एक्स्प्रेस’ ही २ ऑगस्ट २०२६ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसऐवजी दादर (Dadar) स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल. म्हणजेच ही गाडी दादरपर्यंतच धावेल आणि तिथूनच प्रवाशांना उतरावे लागेल.

२) मंगळुरू ते मुंबई CSMT एक्स्प्रेस (Train No. 12134):

मंगळुरू जंक्शनवरून सुटणारी गाडी संख्या १२१३४ ‘मंगळुरू जंक्शन – मुंबई CSMT एक्स्प्रेस’ ही ४ ऑगस्ट २०२६ पर्यंत ठाणे (Thane) स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल. ही गाडी ठाणे स्थानकापुढे धावणार नाही.

प्रवाशांना रेल्वेचे आवाहन:

Vमध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांना होणाऱ्या या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि अधिकृत ‘KR Mirror App’ डाऊनलोड करून गाड्यांचे लाईव्ह अपडेट्स तपासावेत, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment