रत्नागिरी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत स्मार्था कीर प्रथम

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या रत्नागिरी विभागामार्फत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा झाली. या स्पर्धेत खुल्या गटात स्मार्था राजन कीर हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला 11 हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

रत्नागिरी : स्मार्था कीर हिला गौरवताना जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी.

स्मार्था ही सध्या बी.एड. प्रथम वर्षात शिकत आहे. स्मार्था हिला वक्तृत्वाची आवड आहे. यापूर्वी अनेक वक्तृत्व स्पर्धेमध्ये तिने बक्षिसे मिळवली आहेत. स्मार्थाचे शिक्षण एम. ए. अर्थशास्त्र आहे. स्मार्थाच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. बी. एड. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. देशपांडे मॅडम यांनी स्मार्थाच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment