- मांडवी समुद्रकिनारी कुस्तीचा थरार!
रत्नागिरी : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित ‘रत्नसिंधू केसरी २०२६’ या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरीच्या मारुती बिर्जे याने यश संपादन केले. मांडवी येथील मारुती बिर्जे यांनी स्वप्नील घडशी यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव करत मानाचा ‘रत्नसिंधू केसरी’ किताब आणि चांदीची गदा पटकावली.
मांडवी समुद्रकिनाऱ्यावर पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मारुती बिर्जे आणि स्वप्नील घडशी यांच्यात जबरदस्त झुंज पाहायला मिळाली. सुरुवातीपासूनच दोन्ही पैलवानांनी एकमेकांवर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेरच्या क्षणी मारुती बिर्जे यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर प्रतिस्पर्ध्याला चितपट केले. या विजयानंतर मांडवी परिसरात समर्थकांनी मोठा जल्लोष केला.
या जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत शंभराहून अधिक लहान- मोठ्या गटातील कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला. केवळ पुरुषांच्याच नव्हे, तर महिला आणि मुलांच्याही स्वतंत्र कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. रत्नागिरीकरांना ६० हून जास्त कुस्तीमधून जिल्ह्यातील कुस्तीपटूंनी कौशल्य दाखवले. डाव प्रतिडावांनी रंगलेली ही स्पर्धा तब्बल ५ तास चालली. या स्पर्धा पाहण्यासाठी रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यातून कुस्तीप्रेमींनी मांडवी समुद्रकिनाऱ्यावर मोठी गर्दी केली होती.

भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते विजेत्या मारुती बिर्जेला मानाची चांदीची गदा आणि मानपट्टा प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भारत केसरी शाश्वत मानकर, भाजप जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, स्वानंद रानडे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वाडेकर, राजू भाटलेकर यांच्यासह संदीप उर्फ बाबा नाचणकर, जिल्हा चिटणीस समीर टाकळे, चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भुरण, शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, रत्नागिरी शहर मंडल अध्यक्ष दादा ढेकणे, चिपळूण पालिकेचे बांधकाम सभापती शुभम पिसे, नगरसेवक संदीप भिसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, भाई जठार, भाजपच्या जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य ऐश्वर्याताई जठार, जि. प. सदस्य महेंद्र मांडवकर, नगरसेवक अमित विलणकर, नगरसेवक नितीन जाधव, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक दीपा देवळेकर, भाजप युवा पदाधिकारी डॉ. ऋषिकेश केळकर, नित्यानंद दळवी, रत्नागिरी शहर मंडल उपाध्यक्ष शैलेश बेर्डे, शहर सरचिटणीस निलेश आखाडे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष भक्ती दळी, वैद्यकीय सेलचे शहर अध्यक्ष डॉ. मुक्ता बाष्टे, ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्ष सायली बेर्डे, धनश्री पाटील, शोभा जिरोळे, प्रज्ञा टाकळे, प्रसाद बाष्टे, रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष भाई विलणकर, कार्याध्यक्ष चंद्रशेखर केळकर, कार्यवाह सदानंद जोशी यांच्यासह पदाधिकारी तसेच पोलीस निरीक्षक विवेक पाटील व अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी हेही यावेळी उपस्थित होते.

ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खासदार श्री. नारायणराव राणे साहेब यांचे स्वीय सहाय्यक आणि योगेश मगदूम, लबैक ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष शोएब खान, शिवाजी कारेकर, अमोल देसाई, कृष्णा पाटील, ययाती शिवलकर, अशोक वाडेकर, अमृत गोरे, विशाल कांबळे, निखिल शेट्ये, राजेश झगडे, इबद खान, प्रणव सुर्वे, नरेश बनसोडे, सोमनाथ पिलणकर, अभिलाष पिलणकर, अभिलाष कारेकर, राहुल भाटकर, अक्षय शिवलकर, राजू भिसे, ओंकार आंबरे, अमर शेठ, उद्देश लाड, रामदास शेलटकर सायली बेर्डे, ऐश्वर्या जठार, प्रणाली तोडणकर, शोभना जिरोळे आदी सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ आणि आमदार निलेश राणे मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. तर प्रहार डिजिटलच्या माध्यमातून ही स्पर्धा सर्वदूर गेली. मांडवीच्या वाळूत रंगलेल्या या कुस्तीच्या दंगलीने क्रीडाप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
![]()
