Ganpati Special Trains 2026 : पश्चिम रेल्वेकडून अतिरिक्त गणपती स्पेशल गाड्या जाहीर

Team RatnagiriLive
3 Min Read

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने आणखी एक मोठा दिलासा दिला आहे. कोकण रेल्वे मार्ग आणि पश्चिम रेल्वेवरून धावणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांच्या (Ganpati Special Trains 2026) अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वेने घेतला आहे.

​या संदर्भातील अधिकृत प्रसिद्धीपत्रक १३ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आले असून, बुकिंग १५ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होत आहे.

अतिरिक्त गणपती स्पेशल गाड्यांचे वेळापत्रक व फेऱ्या (Train Details):

  1. मुंबई सेंट्रल – थोकूर (साप्ताहिक) स्पेशल:
    • ट्रेन क्र. 09013 (मुंबई सेंट्रल ते ठोकूर) – दिनांक: 08/09/2026 (१ फेरी)
    • ट्रेन क्र. 09014 (थोकूर ते मुंबई सेंट्रल) – दिनांक: 09/09/2026 (१ फेरी)
  2. मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड स्पेशल:
    • ट्रेन क्र. 09019 (मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी) – दिनांक: 09/09/2026 (१ फेरी)
    • ट्रेन क्र. 09020 (सावंतवाडी ते मुंबई सेंट्रल) – दिनांक: 10/09/2026 (१ फेरी)
  3. बांद्रा (टी) – रत्नागिरी अनारक्षित (Unreserved) स्पेशल:
    • ट्रेन क्र. 09035 (बांद्रा टी. ते रत्नागिरी) – दिनांक: 10/09/2026 (१ फेरी)
    • ट्रेन क्र. 09036 (रत्नागिरी ते बांद्रा टी.) – दिनांक: 11/09/2026 (१ फेरी)
  4. वडोदरा जंक्शन – रत्नागिरी (साप्ताहिक) स्पेशल:
    • ट्रेन क्र. 09114 (वडोदरा ते रत्नागिरी) – दिनांक: 08/09/2026 आणि 22/09/2026 (२ फेऱ्या)
    • ट्रेन क्र. 09113 (रत्नागिरी ते वडोदरा) – दिनांक: 09/09/2026 आणि 23/09/2026 (२ फेऱ्या)
  5. विश्वामित्री – रत्नागिरी स्पेशल गाड्या:
    • ट्रेन क्र. 09110 (विश्वामित्री ते रत्नागिरी द्वि-साप्ताहिक) – दिनांक: 09/09/2026 (१ फेरी)
    • ट्रेन क्र. 09109 (रत्नागिरी ते विश्वामित्री) – दिनांक: 10/09/2026 (१ फेरी)
    • ट्रेन क्र. 09124 (विश्वामित्री ते रत्नागिरी साप्ताहिक) – दिनांक: 07/09/2026 (१ फेरी)
    • ट्रेन क्र. 09123 (रत्नागिरी ते विश्वामित्री) – दिनांक: 07/09/2026 (१ फेरी)
  6. उधना जंक्शन – रत्नागिरी स्पेशल:
    • ट्रेन क्र. 09022 (उधना ते रत्नागिरी) – दिनांक: 10/09/2026 (१ फेरी)
    • ट्रेन क्र. 09021 (रत्नागिरी ते उधना) – दिनांक: 10/09/2026 (१ फेरी)
  7. वलसाड – रत्नागिरी स्पेशल:
    • ट्रेन क्र. 09030 (वलसाड ते रत्नागिरी) – दिनांक: 07/09/2026 (१ फेरी)
    • ट्रेन क्र. 09029 (रत्नागिरी ते वलसाड) – दिनांक: 08/09/2026 (१ फेरी)

बुकिंग कधी आणि कुठे कराल? (Ticket Booking Details):

​प्रवाशांनी ध्यान द्यावे की ट्रेन क्रमांक 09014, 09020, 09036, 09113, 09109, 09123, 09021 आणि 09029 या गाड्यांचे बुकिंग १५ ऑगस्ट २०२६ (15/08/2026) पासून सर्व संगणकीय आरक्षण केंद्रांवर (PRS Counter), अधिकृत इंटरनेट वेबसाईटवर आणि IRCTC च्या ॲपवर सुरू होत आहे.

​गाड्यांचे थांबे आणि वेळ याबाबत अधिक माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment