राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रत्नागिरीत ‘रन अँड राइड’ ; दोनशेहून अधिक धावपटूंचा सहभाग

Team RatnagiriLive
100 Views
1 Min Read

रत्नागिरी, दि, २९ : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रत्नागिरीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन प्रॅक्टिस रन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ या संकल्पनेवर आधारित ‘रन अँड राइड’ रॅली आज उत्साहात पार पडली.


उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी मारुती मंदिर येथून या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. ही रॅली मारुती मंदिर येथून निघून जेल नाका मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे पोहोचली, जिथे रॅलीची सांगता झाली. रॅलीच्या प्रारंभी कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या मानसी मराठे यांनी सर्व सहभागी धावपटू व क्रीडाप्रेमींचा वॉर्मअप करून घेतला.

या उपक्रमात जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, कोकण कोस्टल मॕरेथाॕनचे सचिन मराठे, केतकी लेले, स्नेहल कलाल, महेश खेडेकर, अभय सुर्वे, अनिरुध्द कुलकर्णी यांच्यासह रा. भा. शिर्के प्रशालेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध संघटनेचे खेळाडू असे सुमारे २०० हून अधिक धावपटू, क्रीडाप्रेमी व नागरिक सहभागी झाले होते.

जिल्हा क्रीडा आधिकारी श्री शिंदे यांनी यावेळी खेळ, आरोग्य आणि शासनातील करियर याविषयी प्रास्ताविकेत सविस्तर माहिती दिली.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment