रत्नागिरी : खानू येथील ज्येष्ठ पत्रकार आणि माजी नौसैनिक अरुण कृष्णानाथ आठल्ये यांचे शनिवारी दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, पुतणे असा परिवार आहे.
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांचा सहभाग होता. नौदलातून निवृत्त झाल्यानंतर अरुण आठल्ये यांनी मर्चंट नेव्हीमध्ये काही काळ सेवा बजावली. त्यानंतर त्यांनी खानूचे सरपंच पदही भूषवले. त्याच बरोबर विविध वृत्तपत्रांत त्यांनी मुक्त पत्रकार म्हणून काम केले. या दरम्यान त्यांनी अनेक समस्यांना वाचा फोडली होती.
त्यांच्यावर खानू मध्ये उद्या दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 8.00 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
