- जाकीर शेकासन यांची चौकशीची मागणी
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यात प्राथमिक शिक्षकांच्या बेकायदा कामगिरी बदल्यांच्या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. तालुक्यात एकूण ४६ शिक्षकांच्या कामगिरी बदल्या करण्यात आल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. या बदल्या करताना शासनाचे कोणतेही निकष आणि नियम पाळले गेले नसल्याचा गंभीर आरोप होत आहे.याबाबत सविस्तर माहिती देताना पंचायत समितीचे माजी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते जाकीर शेकासन यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. याबाबत लवकरच कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करून चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत सविस्तर माहिती देताना पंचायत समितीचे माजी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते जाकीर शेकासन यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. याबाबत लवकरच कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करून चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या सर्व बदल्या नियमबाह्य आणि मनमानी पद्धतीने झाल्याचा आरोप ग्रामस्थ आणि पालक वर्गातून होत आहे. विशेष म्हणजे या बदल्या मागे मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची ‘अर्थपूर्ण’ चर्चा तालुक्यात जोरात सुरू आहे. पैसे घेऊन सोयीच्या, जवळच्या आणि रस्त्यालगतच्या शाळेत कामगिरी देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून काही शिक्षकांनी लाखो रुपयांची देवाणघेवाण झाल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. यामुळे प्रामाणिक शिक्षकांवर अन्याय झाला आहे.
या सर्व बदल्या नियमबाह्य आणि मनमानी पद्धतीने झाल्याचा आरोप ग्रामस्थ आणि पालक वर्गातून होत आहे. विशेष म्हणजे या बदल्या मागे मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची ‘अर्थपूर्ण’ चर्चा तालुक्यात जोरात सुरू आहे. पैसे घेऊन सोयीच्या, जवळच्या आणि रस्त्यालगतच्या शाळेत कामगिरी देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून काही शिक्षकांनी लाखो रुपयांची देवाणघेवाण झाल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. यामुळे प्रामाणिक शिक्षकांवर अन्याय झाला आहे.या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी सर्व स्तरातून होत आहे. सत्य उघड झालेच पाहिजे, अन्यथा गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षकांवर अन्याय होईल, अशी भीती पालकांनी व्यक्त केली आहे. जर वेळीच चौकशी झाली नाही तर शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास उडेल.
या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी सर्व स्तरातून होत आहे. सत्य उघड झालेच पाहिजे, अन्यथा गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षकांवर अन्याय होईल, अशी भीती पालकांनी व्यक्त केली आहे. जर वेळीच चौकशी झाली नाही तर शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास उडेल.
दरम्यान, सभापती शर्वरी वेल्ये यांनी वादानंतर ३२ बदल्या रद्द करून शिक्षकांना मूळ शाळेत हजर होण्याचे आदेश दिले असले तरी उर्वरित १४ बदल्या कायम ठेवल्याने प्रश्न अधिक गडद झाला आहे. विशेषतः परचुरी नं. ३ येथील शिक्षक चव्हाण यांची कामगिरी कायम ठेवण्यामागे नेमके काय कारण आहे, याचाही खुलासा झाला पाहिजे, असा सवाल उपस्थित होत आहे.या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र समिती नेमून चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. आता सर्वांचे लक्ष चौकशीच्या अहवालाकडे लागले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र समिती नेमून चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. आता सर्वांचे लक्ष चौकशीच्या अहवालाकडे लागले आहे.
