लायन्स इंटरनॅशनलतर्फे पत्रकार यशवंत खोपकर, शांताराम गुडेकर यांचा पुरस्कार देऊन गौरव

Team RatnagiriLive
1 Min Read

मुंबई (प्रतिनिधी ) : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231 A1 यांच्या वतीने सप्टेंबर महिना ‘Editors’ Month’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने २४ सप्टेंबर २०२६ रोजी फोर्ट, मुंबई येथील इंडो-अमेरिकन सोसायटीमध्ये आयोजित विशेष सन्मान व पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन पवन के. अग्रवाल, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. संदीप चव्हाण, प्रथम उप-डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन होजेफा घडियाली, द्वितीय उप-डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन सायरस सुरती व डिस्ट्रिक्ट प्रिन्सिपॉल पी.आर.ओ. लायन संजय मेहता व टीमच्या हस्ते विक्रोळी पार्क साईट येथील पत्रकार यशवंत विठ्ठल खोपकर तसेच शांताराम गुडेकर यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाची दखल घेत लायन्स इंटरनॅशनलतर्फे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.श्री. जितेंद्र दगडू दादा सकपाळ यांच्या शिफारसमुळे हा सन्मान मिळाल्याबद्दल श्री. यशवंत खोपकर, शांताराम गुडेकर यांनी आभार व्यक्त केले.या कार्यक्रमात संपादक व पत्रकारांचा गौरव करण्यात आला.

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231 A1 चे पदाधिकारी तसेच मान्यवर यावेळी उपस्थित होते.श्री. यशवंत विठ्ठल खोपकर, शांताराम गुडेकर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल पत्रकारिता, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment