ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज

आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नाने हिवाळी अधिवेशनामध्ये चिपळुण संगमेश्वर मतदारसंघासाठी ५४ कोटीचा निधी मंजूर


देवरूख (सुरेश सप्रे): जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांची झालेली अत्यंत दयनीय अवस्था पाहता या रस्त्यांची दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने व दळणवळणासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची होणारी ओढाताण संपविण्यासाठी आमदारांनी सबब बाब महायुती सरकारच्या लक्षात आणून दिली. आमदारांच्या या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांसाठी शासनाने निधी उपलबद्ध करून दिला.

या अनुषंगाने आमदार शेखर निकम यांनी चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण मार्गांसाठी 12 कोटी 81 लाख निधी मंजूर केला. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असणारे रस्ते, पुल, वॉल यांसाठी चिपळूण व संगमेश्वर तालुक्यांसाठी 41 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मतदार संघासाठी दिलेल्या या निधीबद्दल आमदार शेखर निकम यांनी महायुती सरकारचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले. सोबतच कोकणचे पहिले सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे देखील विशेष आभार मानले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button