मांडकी-पालवण येथील कृषी महाविद्यालयात कृषि दिन साजरा

Team RatnagiriLive
1 Min Read

चिपळूण : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण मध्ये दि. ०१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र कृषि दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या वेळी राज्यातील कृषिक्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तृतीय वर्षातील कु.प्रज्ञा गोठणकर व द्वितीय वर्षातील कु.शितल डोहाळे या विद्यार्थ्यांनीने कृषिदिनाविषयी मनोगत व्यक्त केले. प्राध्यापक मोहिरे यांनी विद्यार्थ्यांना कृषी दिन का साजरा करावा याबद्दल मार्गदर्शन केले.

जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. शमिका चोरगे यांनी कृषिदिन साजरा करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संकेत कदम यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. त्यानंतर महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment