अलिबाग : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत रायगडमधील कार्यक्रमात बोलताना दिली.
रायगर जिल्हास्तरीय मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा प्रतिनिधीक स्वरूपातील शुभारंभ कार्यक्रम तसेच जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून लाभार्थींना ई शॉप वाहन वितरणाचा कार्यक्रम पार पडला त्यावेळी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत बोलत होते.
यावेळी ना. अदिती तटकरे यांच्यासह विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
