कुवे-इंदवटी-वनगुळे रस्ता खचला ; वाहतूक बंद पडण्याची भीती

Team RatnagiriLive
1 Min Read

लांजा : लांजा तालुक्यातील कुवे इंदवटी वनगुळे रस्ता खचल्यामुळे रस्ता वहातूकीस धोकादायक ठरत असुन वहातूक बंद होण्याची भीती ग्रामस्थांमध्ये व्यक्त केली जात असुन तातडीने डागडुजी करण्याची मागणी होत आहे.

हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून दोन वर्षांपूर्वीच करण्यात आला आहे. वनगुळेच्या पुढे डावरे येथे रस्ता खचल्यामुळे वाहतुकीस रस्ता धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरून एसटीच्या आठ ते नऊ फेऱ्या होतात. तसेच इतर वाहनांची सतत वर्दळ असते. या भागातून साठ ते सत्तर विद्यार्थी लांजा येथे शाळेला ये जा करतात . रस्त्यावरील वहातूक बंद पडल्यास विद्यार्थी व प्रवासी वर्गाची मोठी गैरसोय होणार असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित यंत्रणेकडून या रस्त्याची तत्काळ पहाणी करून संभाव्य होणारा धोका टाळण्यासाठी तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थातून केली जात आहे

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment