रस्ता वाहून गेल्याने चिंद्रवली ग्रामस्थांचा संपर्क तुटला

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : सततच्या मुसळधार पावसामुळे निरखुणे (चिंद्रवली) येथील रस्ता वाहुन गेल्याने संपर्क व्यवस्था कोलमल्याने गावकऱ्याना किराणा, भाजीपाला, कामावर जाण्या साठी तसेच शेती कामासाठी भर पावसात पायी तासभर चालून चांदेराई बाजारपेठेत जावे लागत आहे.

ग्रामपंचायत रेल्वे प्रशासनाचे गावकऱ्याकडे दुर्लक्ष केल्याने गेली काही वर्ष प्रत्येक पावसात अशीच समस्या उद्भवते आहे. मात्र, यावर्षी तुलनेने सतत महिनाभर पाऊस कोसळत असल्याने रस्ता वाहून गेला आहे.

दरम्यान, रस्त्याच्या निकृष्ट दर्जाची आता तरी दखल घेऊन तातडीने याबद्दल कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment