आपत्ती व्यवस्थापन जनजागृतीसाठी रत्नागिरीत उद्या मॅरेथॉन

Team RatnagiriLive
1 Min Read

आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे ‘एक धाव सुरक्षेची

रत्नागिरी, दि. 13 : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्ती व्यवस्थापन संबंधित जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत उद्या बुधवार दि. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बैठक झाली. बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

पोलीस क्रीडांगणावरुन उद्या सकाळी 8 वाजता या मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment