‘हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत भेंडखळ ग्रा.पं. कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकला

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण दि १३ (विठ्ठल ममताबादे ) : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. ध्वजारोहण ग्रामपंचायतचे उपसरपंच अभिजित देवानंद ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास ग्रामपंचायतच्या सरपंच मंजिता पाटील , सदस्य दीपक ठाकुर, ग्रामपंचायत सदस्य लिलेश्वर भगत, अजित ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सोनाली ठाकूर ,स्वाती पाटील, स्वाती घरत ,शितल ठाकूर, प्राची पाटील, अक्षता ठाकूर, संगीता भगत व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्राम विकास अधिकारी किरण केणी, वरिष्ठ लिपिक दीपाली मते,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण सर, विकास म्हात्रे, अनिरुद्ध पाटील व पूर्ण स्टाफ, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी हजर होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment