जगाच्या पोशिंद्याला मानाचा मुजरा करण्यासाठी दापोलीत २५ डिसेंबरला सायकल फेरी

Team RatnagiriLive
1 Min Read

दापोली सायकलिंग क्लबचा अनोखा उपक्रम

दापोली : दरवर्षी भारतामध्ये २३ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. स्वत:च्या रक्ताचं पाणी करुन संपूर्ण जगाच्या भूकेसाठी राबणाऱ्या जगाच्या पोशिंद्याला मानाचा मुजरा करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार २५ डिसेंबर २०२२ रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७:३० वाजता सुरु होईल. ती उदयनगर- लष्करवाडी- फणसाचे वाकण- चैतन्य नगर- अश्विनी अ‍ॅग्रो फार्म्स- इच्छापूर्ती गणेश मंदिर- नॅशनल हायस्कुल- आझाद मैदान अशी ५ किमीची असेल. समारोप आझाद मैदान येथे ९:३० वाजता होईल. मातीतून सोने उगवणाऱ्या शेतकरी बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या मार्गावरील काही शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येईल. वेलकम नर्सरी, अश्विनी अ‍ॅग्रो फार्म्स येथे वेगवेगळी पिके, शेतीच्या पद्धती, झाडांबद्दल माहिती करुन घेण्यात येईल.

या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकल प्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८३०८३६६३६६, ८७६७६५०५३७ हे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकल विषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment