दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : दावते इस्लामी शाखा रत्नागिरी तर्फे 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन मद्रसा फैजाने अत्तार येथे ठीक सकाळी ९ वाजता उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सुदेश मयेकर हे उपस्थित होते.

या वेळी माजी नगरसेवक सुदेश मयेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर सर्वांना जिलेबी तसेच समोसे वाटप करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला दावते इस्लामी रत्नागिरी शाखेचे मौलाना अल्ताफ कुरेशी तसेच उवेस जरीवाला, फारूक जरीवाला, अली असगर अत्तारी, अकील मेमन, साजिद मेमन तसेच इतर सदस्य, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, मुसा काझी तसेच कोकणनगर परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment