FLY 91 | पुणे येथून सिंधुदुर्ग गोव्यासाठी ३१ ऑगस्टपासून थेट विमानसेवा

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : पुणे येथून गोवा तसेच सिंधुदुर्गसाठी थेट प्रवास विमानसेवा दि. ३१ ऑगस्ट २०२४ पासून सुरू होत आहे. सिंधुदुर्गसह गोव्यातील पर्यटनाला यामुळे चालना मिळण्यास मदत होणार आहे.

फ्लाय 91 कंपनीच्या विमानसेवाला यासाठी परवाना मिळाला आहे. पुणे ते गोवा तसेच पुणे ते सिंधुदुर्ग या प्रवासासाठी फ्लाय 91 कंपनीच्या विमानांमधून 1991 मध्ये प्रवास करता येणार आहे.

याबाबत फ्लाय 92 या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार पुणे येथून गोव्यासाठी सकाळी १० वा. ५५ मिनिटांनी विमान उड्डाण घेईल तर गोव्याला ते १२ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल.

पुणे येथून सिंधुदुर्गसाठी सकाळी ८ वाजून ०५ मिनिटांनी विमान सुटणार आहे. ९ वाजून १० मिनिटांनी ते सिंधुदुर्ग विमानतळ शनिवार व रविवार अशी दोन दिवस सध्याची सेवा उपलब्ध असेल, असे फफ्लाय 91 कंपनीने म्हटले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment