Konkan Railway | मडगाव- पनवेल-मडगाव विशेष गाडीचे आरक्षण आजपासून सुरु

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : गणेशोत्सवामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाढलेली गर्दी लक्षात घेऊन दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी मडगाव ते पनवेल मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. एकूण 20 एलएचबी डब्यांसह ही गाडी धावणार आहे. या विशेष गाडीसाठी चा आरक्षण दि. 10 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

गणपती विसर्जनानंतर वाढलेली गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने गर्दीनुसार विशेष गाड्यांचे नियोजन करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यानुसार मडगाव ते पनवेल मार्गावर दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी विशेष गाडी (01428) सुटेल. पनवेलला ती रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही गाडी (01427) पनवेल येथून रात्री अकरा वाजून 45 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता ती मडगाव ला पोहोचणार आहे.

विशेष गाडीचे थांबे

करमाळी, थिवी, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, आरवली, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव रोड तसेच पेण.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment