राज्यातील २२९० शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : समग्र शिक्षा अंतर्गत राज्यातील २२९० शाळेमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापित केल्या असून प्रत्येक शाळेवर या संगणक प्रयोगशाळेसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे  एक इन्स्ट्रक्टरही रुजू करण्यात आलेले आहेत.

आधुनिक काळात टिकायचे असेल तर संगणकाशी मैत्री करावी लागेल व ते शिकावं पण लागेल हे उद्दिष्ट समोर ठेवून, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई ,राज्य प्रकल्प संचालक श्रीमती आर विमला यांनी आयसीटी (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) हा उपक्रम राबविण्याचे योजिले आहे. यामध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ३ शाळा व २ गट साधन केंद्रांमध्ये हा उपक्रम चालू a अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, श्रीमती आर विमला मॅडम यांच्या सूचनेप्रमाणे व रत्नागिरी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी श्री. बी. एम. कासार सर (प्राथमिक) यांच्या मार्गदर्शनाने राबविण्यात येत आहे, तर येणाऱ्या काळात या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment