गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालयात महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्रींना आदरांजली

Team RatnagiriLive
1 Min Read

सावर्डे : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण मदि. ०२/१०/२०२४ रोजी महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजी यांच्या जीवनातील प्रसंग मनोगतातून व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्राचार्य डॉ. संकेत कदम यांनी विद्यार्थ्यांना गांधीजींनी भारताला मिळवून दिलेल्या स्वातंत्र्यातील योगदान तसेच लाल बहादूर शास्त्री यांचे विचार याबद्दल मार्गदर्शन केले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, प्रा. सूर्यवंशी, डॉ मोहिते, प्रा. बोकडे व सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment