लांजात बिबट्या विहिरीत पडला ; सुटकेसाठी वन विभागाचे पथक दाखल

Team RatnagiriLive
1 Min Read

लांजा : लांजा शहरातील संतोष लिंगायत यांच्या विहिरीत बिबट्या पडला असून बिबट्याची विहिरीतून सुटका करण्यासाठीं वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

आज (मंगळवारी) सकाळी ८ वाजता दरम्यान लिंगायतवाडी येथील नागरिकांना विहिरीत बिबट्या पडलेला दिसला भक्षाचा पाठलाग करताना विहिरीत पडलेला आहे. मात्र पाण्यात बिबट्या हा विहिरीच्या एका बाजूला सुरक्षित आहे. वनपाल श्री. फकीर वनरक्षक श्रावणी पवार, तनुजा कांबळे, अमित लांजेकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बचाव कार्यात येथील नगरसेवक राजू हळदणकर, संतोष लिंगायत यांचे वनविभागाला सहकार्य करत आहेत.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment