पोस्टाद्वारे पाठवा दिवाळी फराळ थेट परदेशात !

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी :  जिल्ह्यातील अनेक नागरिक कामानिमित्त बाहेरगावी किंवा परदेशात जातात. अशा नागरिकांना दिवाळीत आपल्या घरचा फराळ मिळावा, यासाठी पोस्ट ऑफिसमार्फत परदेशात फराळ पाठवला जात आहे. आपल्या घरातील व्यक्तींना व नातेवाईकांना दिवाळीचा फराळ परदेशात मिळावा याकरिता पार्सल पाठविण्यासाठी सर्व पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे. रत्नागिरी डाक
विभागामार्फत रत्नागिरी प्रधान डाकघर व चिपळूण प्रधान डाकघर येथे पॅकिंगची देखील सुविधा करण्यात
आली आहे.

फराळ परदेशात पाठवण्यासाठी पार्सलचे दर १० किलोला देशनिहाय पुढीलप्रमाणे आहेत. ऑस्ट्रेलिया ११ हजार ९१२ रुपये, कॅनडा ९ हजार ६७६ रुपये, अमेरिका ९ हजार ५१ रुपये, यु.ए.ई. ३ हजार ४९३ रुपये, रशिया ६ हजार ७५० रुपये, यु.के. ६ हजार ४६१ रुपये, जपान ४ हजार ७९७ रुपये. पोस्ट ऑफिसच्या सेवेचा जिल्हयातील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन एन.टी. कुरळपकर अधीक्षक डाकघर रत्नागिरी यांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment