Konkan Railway | मडगाव- मुंबई वनवे स्पेशल ट्रेन १ नोव्हेंबर रोजी धावणार!

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : दिवाळी सणातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गे मडगाव जंक्शन ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी वनवे स्पेशल गाडी दिनांक एक नोव्हेंबर 2024 रोजी धावणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वे कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मडगाव जंक्शन ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (02052) ही एक मार्गी विशेष गाडी दिनांक १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता मडगाव जंक्शनवरून सुटेल आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ती त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.

वनवे स्पेशल गाडीचे थांबे

थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण रोहा, पनवेल.

या वनवे स्पेशल गाडीला सध्या कोकण रेल्वे मार्गावर धावत असलेल्या जनशताब्दी एक्सप्रेस प्रमाणे एक विस्टा डोम कोच, एसीचे चेअर कार 3, सेकंड सेटिंगचे 10 डबे तसेच जनरेटर कार व एस एल आर चा प्रत्येकी एक असे एकूण 16 डबे जोडण्यात येणार आहेत.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment