जसखार येथे १० नोव्हेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण (विठ्ठल ममताबादे ) :  गोरगरिबांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे. रक्ताअभावी कुणाचा जीव जावू नये. या अनुषंगाने दरवर्षी स्व. श्री गुलाबभाई म्हात्रे यांच्या स्मरणार्थ स्व.श्री. गुलाबभाई म्हात्रे मित्र मंडळ जसखार यांच्या तर्फे गरजूंना जीवनदान देण्याच्या उद्देशाने दरवर्षी जसखार येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते.

स्व. श्री गुलाबभाई म्हात्रे

यंदा स्व. श्री गुलाबभाई म्हात्रे यांच्या स्मरणार्थ रविवार दि १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत श्री रत्नेश्वरी मंदिर, जसखार, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गरजू व्यक्तींनी या रक्तदान शिबीरात मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन केतन म्हात्रे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी केतन म्हात्रे फोन नंबर – ९८७०९८४५४४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment