मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या फेसबूक पेजवर झळकली रत्नागिरी मतदारसंघातील छायाचित्रे!

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी, दि.१५ : रत्नागिरी विधानसभा मतदार संघात येथील नगरपरिषदेच्या दामले विद्यालयात झालेल्या टपाली मतदानाची छायाचित्रे मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आली आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी/कर्मचारी आणि पोलीस तसेच इतर जिल्ह्यातील अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा येथील नगरपरिषदेच्या दामले विद्यालयातील मतदान केंद्रावर केली होती. यावेळी याचा लाभ निवडणूक कर्तव्यावर अधिकारी/कर्मचारी पोलीस यांनी घेतला होता. विशेषतः येथील टपाली मतदानासाठी सूचना हा भला मोठा सुरुवातीलाच प्रदर्शित करण्यात अलेला आणि भला मोठा येथे उभारण्यात आलेला सेल्फी पाॕईंट विशेष लक्ष वेधून घेत होता.

दोन दिवस झालेल्या टपाली मतदान प्रक्रियेची छायाचित्रे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट केली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment