खूषखबर !!! रत्नागिरी-दादर होळी अनारक्षित विशेष गाडी

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : वीस वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू असलेली आणि सध्या रत्नागिरी ते दिवा मार्गावर चालत असलेली पॅसेंजर गाडी पूर्वीप्रमाणे दादरपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला असतानाच मध्य रेल्वेने होळीसाठी दिनांक 11 मार्च 2025 पासून विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या एकूण सहा फेऱ्या होणार आहेत.

रेल्वेची ही हातचलाखी मान्य नाही. दादर- रत्नागिरी नियमित गाडीचा बळी देऊन केवळ तीन फेऱ्यांची एक्सप्रेस नको. हे थांबे तर तुतारीला आहेत. आम्हाला पॅसेंजर हवी. आंदोलनाची हवा काढण्याच्या प्रयत्नाला शिवसेनेने बळी पडू नये. एकतर जुनी गाडी पूर्ववत करून घ्यावी किंवा नवी गाडी कायमस्वरुपी करावी.

अक्षय महापदी, सचिव अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती.

होळीसाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाडी संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार  ०११३१ दादर रत्नागिरी होळी विशेष गाडी ११, १३ व १६ मार्च, २०२५ दुपारी १४:५० ला सुटून रात्री २३:४० ला रत्नागिरीला पोहोचेल.

०११३२ रत्नागिरी दादर होळी विशेष गाडी १२, १४ आणि १७ मार्च, २०२५ पहाटे ४:३० ला सुटून दुपारी १३:२५ ला दादरला पोहोचेल. एकूण 16 डब्यांच्या या गाडीला जनरलचे 14 तर एस एल आर दोन डबे जोडले जाणार आहेत.

विशेष गाडीचे थांबे :

ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment