अनिरुद्ध उपासना केंद्राच्या रक्तदान शिबिरात केले १६४ जणांनी रक्तदान!

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण दि ३(विठ्ठल ममताबादे ) : रक्ताअभावी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये तसेच गोरगरिबांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे हा मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून अनिरुद्ध उपासना केंद्र उरण आणि मुळेखंड केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद शाळा, पेन्शनर्स पार्क, उरण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २०० व्यक्तींची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी १६४ दात्यांकडून रक्त स्वीकारण्यात आले.

एकंदरीत एकूण १६४ रक्तदान झाले. रक्तदानाविषयी जनजागृती करत आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांचा, जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. अनिरुद्ध उपासना केंद्र उरण व मुळेखंड केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उरण मध्ये दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.

अनिरुद्ध अकॅडमी डिझास्टर मॅनेजमेंटच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला एस. एल. रहेजा ब्लड बँकेचे महत्वाचे सहकार्य लाभले. सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी अनिरुद्ध उपासना केंद्र उरण व मुळेखंड केंद्रच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी, भाविक भक्तांनी विशेष मेहनत घेतली.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment