विधानसभा सदस्य म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शपथ

Team RatnagiriLive
0 Min Read

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून आज विशेष अधिवेशनात शपथ घेतली.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन-२०२४ प्रारंभापूर्वी विधानभवन प्रांगणातील छत्रपतीशिवाजीमहाराज यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह नवनिर्वाचित सदस्यांचे अभिवादन केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दुसरे उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांनी देखील विधानसभा सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment