रत्नागिरीत डी मार्ट समोरील वर्दळीच्या रस्त्यावर सीएनजी गळतीनंतर घबराट

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : रत्नागिरी- कोल्हापूर मुख्य मार्गावर डीमार्ट समोरील गजबजलेल्या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे धक्के बसून सीएनजी टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायूगळती होऊन झालेल्या मोठय़ा आवाजाने डी मार्ट परिसरात शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एकच खळबळ उडाली. घटनेनंतर एमआयडीसी तसेच नगर परिषदेच्या अग्निशमन पथकांनी तातडीने धाव घेतल्याने वायूगळतीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टाळली.
या दुर्घटनेमुळे तासभरापेक्षा जास्त काळ मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कोल्हापूर- रत्नागिरीकडे येणारा मुख्य मार्ग खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावरून महानगर गॅस कंपनीचा टँकर (क्र.7079) रत्नागिरीच्या दिशेने येत होता. शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हा टँकर कुवारबाव परिसरातील डी मार्ट समोरील ठिकाणी असताना त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. दोन व्हॉल्व्हमधून ही गॅस गळती सुरू होती. दुर्घटनेनंतर वाहनधारकांची देखील यामुळे पळापळ झाली. टँकरमधील गॅस वेगाने बाहेर पडत होता.

या गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व अनर्थ टाळण्यासाठी अग्निशमन पथकांना पारण करण्यात आले. पोलीस यंत्रणाही दाखल झाली. यामुळे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment